अजित पवार यांचे मोठे वक्तव्य:'त्या' ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे - नाना पटोलेंचा; म्हणाले, एक बहीण तर दुसऱ्यांसोबत मी काम केले

1 day ago 1
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरील बिटाकॉइन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा या दोघांचाच आवाज असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले की, "जे काही ऑडिओ क्लिप दाखवले जात आहे, मला एवढेच माहित आहे की, मी या दोघांसोबत काम केले आहे. त्यापैकी एक माझी बहीण आहे. दुसरे असे आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांचा आवाज मला ओळखता येतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्व 'राज' म्हणजेच सर्व सत्य स्पष्ट होईल.' राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत केली होती. यावरुन अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरील आरोपांवर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य लोकांसमोर येईल, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत देखील अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बहुमताचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदार एकत्र बसून मुख्यमंत्री कोण? या बाबत निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही महायुतीचे सर्व निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू, असे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील अजित पवार यांनी सर्व अडचणी सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शेतकऱ्यांना एमएसपी वाढवून देण्याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेण्याचा आग्रह त्यांना करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीमधून विजयाचा विश्वास अजित पवार म्हणाले की, "आम्ही काम केले आहे, आम्हाला काम करायचे आहे आणि आमच्याकडे भविष्यातील कामाचे व्हिजन आहे. मला बारामतीच्या मतदारांवर विश्वास आहे की ते मला विजयी करून पाठवतील, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. मी आठव्यांदा विधानसभेत आलो असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. सध्या जास्तीत जास्त मतदान करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. बिटकॉइन घोटाळ्यात सुप्रिया सुळे, पटोले यांचा सहभाग? विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणात निर्माण झालेला राजकीय गोंधळ थांबत नाही तोच आता बिटकॉइनचा वाद समोर आला आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article