अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार?:माढाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांनीही दिली प्रतिक्रिया

2 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते उमेदवारीसाठी पक्ष बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघात देखील मोठे बदल घडत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडत नेते मंडळी शरद पवारांच्या गटात जात असल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार माढामध्ये होणार असण्याचे चिन्ह दिसत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांनी शरद पवार गटाचे प्रदशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. याबात जयंत पाटलांना विचारले असता त्यांनी बबनदादा शिंदे यांच्या मनात नेमके काय आहे हे माहीत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा माढा येथील राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या पक्षाकडून आपल्या सुपुत्रास उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. एकतर तुतारीकडून रणजीत शिंदे निवडणूक लढवतील नाहीतर अपक्ष निवडणूक लढवतील, अशी भूमिका बबनदादा शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी मांडली होती. त्यामुळे शरद पवार रणजीत शिंदे यांना उमेदवारी देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढण्यासाठी अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय कोकाटे ही नावे देखील स्पर्धेत आहेत. दरम्यान, अजित पवारांवर त्यांच्या पक्षातीलच अनेक नेते नाराज असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला गळती लागल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article