Published on
:
02 Feb 2025, 11:35 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:35 pm
सोलापूर : खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित शिक्षकांची माहिती प्राथमिक शिक्षण विभागास कळवावी, असे पत्र शिक्षणाधिकारी यांनी दिले होते. त्या पत्राकडे खासगी शाळांनी दुर्लक्ष केले असून, अद्यापही शिक्षकांच्या समायोजनाची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केली नाही.
शाळेतील अनुदानित अतिरिक्त शिक्षकांची संस्थेमध्ये समान वेतनश्रेणीत रिक्त जागेवर संबंधित शिक्षकांचे समायोजन करून मान्यतेसाठी प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवावे. संस्था अंतर्गत शिक्षकांचे समान वेतनावर समायोजन करून उर्वरित अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडे पाठवा, अशा सूचना खासगी शाळेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र, याकडे खासगी प्राथमिक शाळांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न केल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षकांची जबाबदारी शाळेवर राहील, असे सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित शिक्षकांची माहिती द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून त्याची माहिती पाठविण्याचे आदेश दिले. शाळेकडून अद्यापही माहिती आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात येतील.