अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तीनों....Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 3:48 am
Updated on
:
24 Nov 2024, 3:48 am
नाशिक : लाडक्या बहिणींनी महायुतीला तारले असून, 'बटेंगे तो कटेंगे' यावर विश्वास ठेवत उत्तर महाराष्ट्रातील मतदारांनी भरभरून मतांचा जोगवा टाकल्याने ३५ पैकी ३३ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे. यात भाजपला सर्वाधिक १६, शिवसेना शिंदे गटाला नऊ, राष्ट्रवादी अजित पवार गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस, एमएआयएमला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे तर शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला उत्तर महाराष्ट्रात खातेही उघडता आलेले नाही. विजयकुमार गावित, छगन भुजबळ, दादा भुसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील हे सहाही मंत्री पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.
राज्यातील निकालाचा ट्रेंड उत्तर महाराष्ट्रातही कायम राहिला असून नाशिक जिल्ह्यात 'मविआ'चा सुपडा साफ झाला असून १५ पैकी १४ जागांवर महायुतीचा विजय मिळविला तर एमआयएमने आहे. महायुतीने १५ पैकी १४ जागा लढविल्या त्यात सर्वच १४ जागांवर विजय मिळविला. सर्वाधिक ७ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट तर भाजपला पाच, शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमने जागा राखली आहे.