अनिल देशमुखांवर झालेला हल्ला किती फेक हे पोलिसांनी सांगितले:देवेंद्र फडणवीस, सर्वांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

1 day ago 1
अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला किती फेक आहे. हे काल एसपी आणि आयजी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे. त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला, त्यांचे व्हिडिओ समोर यायला पाहिजे असे नागपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. मतदान हा केवळ आपला हक्क नाही, ते आपले कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे मी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले असून महाराष्ट्रातील लाडक्या बहिण-भावांनीदेखील मतदान केले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या वेळी यांद्यामध्ये घोळ देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत सरकारकडून अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडून आपल्याला विनंती आहे की मतदान करा. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल. लोकसभा निवडणुकीत मतदान याद्यांमध्ये घोळ होता तो काही प्रमाणात कमी झाला आहे. लोकसभेच्या वेळी मतदानाची प्रक्रिया स्लो होती, यावेळी ती तशी राहणार नाही, असे यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे. महिला मतदानांचा टक्का वाढेल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत महिलांचा मतदानाचा टक्का 5 ते 6 टक्क्यांनी पुरुषांपेक्षा कमी असतो. पण यावेळी निश्चित आमच्या बहिणी मतदान करतील. ही जी टक्केवारी आहे त्या भरुण काढतील. जनतेचे प्रेम जेव्हा मिळते तेव्हा चेहऱ्यावर हास्य येत असते, ते मिळत असल्याने माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे. देशमुखांवरील हल्ला म्हणजे हिंदी चित्रपटातील स्टोरी 10 किलोचा गोटा काचेच्या खिडकीवर मारला, तर ती खिडकी तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडल्यानंतर बोनेटला साधी स्क्रॅच देखील का आली नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहे. एकच गोटा गाडीत दिसला असून तो गोटा कारच्या मागील बाजुने मारलेला आहे. मागील बाजुने दगड मारला, तर तो मागे लागायला पाहिजे. तो समोर कसा लागला? मागून फेकलेला दगड गोल फिरून समोरुन लागणे, अशाप्रकारचा दगड फक्त रंजनीकांतच्या चित्रपटात फेकला जाऊ शकतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article