अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी मनमाडला निषेध:दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइंची मागणी

1 day ago 1
अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं (आठवले) शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून शहर पोलिस प्रशासन तसेच मंडल अधिकारी यांना देण्यात आले. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपाइं पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. हा प्रकार संतापजनक असून सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी काही समाज विघातक वृत्तीच्या इसमांनी ही घटना घडवून आणली आहे. या घटनेला पंजाबचे सरकार जबाबदार आहेत. संबंधित आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे करण्यात आली. रिपाईचे माजी नगराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा सरचिटणीस गंगाभाऊ त्रिभुवन, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश आहिरे, सुरेश जगताप, सुरेंद्र आहिरे आदींनी हे निवेदन दिले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article