Published on
:
04 Feb 2025, 11:36 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:36 pm
वॉशिंग्टन : चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या मोठ्या देशांमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी अस्तित्वात आहेत. पण, अमेरिकेतील नेवाडा इथं एक अशी खाण आहे जिथं संपूर्ण अमेरिकेतील सोन्याचा 75 टक्के पुरवठा केला जातो. ‘सोन्याच्या खाणीचा गड’ अशी नेवाडा इथं असणार्या सोन्याचा खाणीची ओळख आहे. सोन्याच्या उत्पादनामध्ये नेवाडाचं मोठं योगदान असून, जगभरात या खाणीची ओळख आहे.
19 व्या शतकामध्ये या खाणीचा शोध लागला होता. तेव्हापासूनच ही खाण आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक द़ृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नेवाडा इथं असणार्या या सोन्याच्या खाणींमुळं स्थानिक अर्थसत्तेला प्रसिद्धीझोतात आणलं असून, नेवाडातील या खाणींमध्ये ‘कार्लिन ट्रेंड’चं नाव आवर्जून घेतलं जातं. जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींमध्ये ही खाण गणली जाते. कार्लिन ट्रेंडमध्ये माइक्रोस्कोपिक सोन्याचे कण सापडतात, ज्यांना ‘कार्लिन-स्टाईल गोल्ड डिपॉजिट्स’ म्हटलं जातं. नेवाडातील या कार्लिन ट्रेंडमधून आतापर्यंत 70 मिलियन औंस म्हणजेच (19 लाख किलोग्राम) पेक्षा जास्त प्रमाणातील सोन्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. या क्लिष्ट प्रक्रियेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नेवाडा इथं असणार्या सोन्याच्या खाणींमध्ये स्थानिक परिघातून मोठ्या संख्येनं रोजगारनिर्मिती झाली असून, खाणीत काम करणार्या कुटुंबीयांना आर्थिकद़ृष्ट्या मोठा आधारही मिळाला आहे. नेवाडा येथील सोन्याच्या खाणींचा इतिहास फक्त येथील खनिज संपत्तीपुरताच सीमित नसून, इतरही अनेक द़ृष्टिकोनातून त्याचं महत्त्वं आहे.