डॉ. उत्तम फोंडेकर यांना वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट देताना लक्ष्मण कुरकुटे व कृषी कर्मचारी.pudhari photo
Published on
:
22 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:45 am
मालवण ः मालवण-कुंभारमाठ येथील प्रथितयश आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत, 2 नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावला. त्यांची ही आंबा पेटी भारतातच नव्हे, तर यंदाची जगातील पहिली आंबा पेटी म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गणली गेली आहे.
यामुळे यशस्वी आंबा व्यावसायिक असणार्या डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याचा नावलौकीक झाल्याची भावना सर्वस्तरांतून व्यक्त होत आहे.
लंडनवरून पाठविलेले वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आणि मेडल नोडल ऑफिसर लक्ष्मण कुरकुटे आणि इतर कृषी कर्मचार्यांच्या उपस्थितीत डॉ. फोंडेकर यांना प्रदान केले. या वर्ल्ड रेकॉर्डमुळे सिंधुदुर्ग व मालवणचे नाव पर्यटनबरोबर हापूस क्षेत्रातही जगात झळकले आहे.
डॉ. उत्तम फोंडेकर यांनी 2 नोव्हेंबर रोजी मार्केटमध्ये हापूस आंब्याची पेटी पाठविली होती. जगातील पहिल्या मानांकनाची पेटी म्हणून ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ला गणली गेली. त्यामुळे जगात जपानच्या मियाँझकीच्या आंब्याचे असलेले प्राबल्य कमी होऊन हापूसचे प्राबल्य प्रस्थापित झाले आहे.
बी. बी. नाईकनवरे, जिल्हा कृषी अधीक्षक