अभ्यास करीत नाही म्हणून आई रागावल्याच्या कारणावरून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री चिंबळी येथे घडली.
सिद्धी संदीप थोरात (वय 17, रा. मंत्रा सोसयटी, चिंबळी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांनी याबाबत माहिती दिली. सिध्दी ही विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. ‘परीक्षा जवळ आल्याने अभ्यास कर’, असे आई तिला ओरडली. या कारणावरून रागाच्या भरात सिद्धी हिने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दुपट्ट्याच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.