Published on
:
03 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:40 am
सावंतवाडी ःवेंगुर्ले हद्दीत आजगाव चिरेखाणी भागात राजरोसपणे अंदर बाहर जुगार अड्डा सुरु आहे. या जुगारात स्थानिक व बाहेरील जणांना मोठी प्रवेश फी घेऊन खेळण्यास परवानगी दिली जाते. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही पोलिसांनी कोणतीही दखल घेतलेली नसून लाखो रुपयांची उलाढाल या जुगारातून होत आहे.
सावंतवाडी लगतच लागून असलेल्या वेंगुर्ले हद्दीत अजगाव येथे बंद पडलेल्या चिरेखाणीत मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु आहे. रात्री-अपरात्री जुगार खेळण्यासाठी कणकवली, सावंतवाडी, गोवा, दोडामार्ग भागातील बरेचजण या ठिकाणी दाखल होतात. स्थानिक व बाहेरील जणांना प्रवेश फी आकारुन या जुगारात खेळण्यास परवानगी दिली जाते. वेंगुर्ले हद्दीत हा जुगार अड्डा सुरु असल्यामुळे याबाबत स्थानिकांनी कित्येक तक्रारी पोलिस ठाण्यात केल्या मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, तर सिंधुदुर्ग पोलीसांना देखील याची कल्पना देण्यात आली आहे. तरीही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. एका स्थानिकाच्या मदतीने हा जुगार अड्डा सुरु करण्यात आला आहे, तर यामागे आणखीनही बरेच सूत्रधार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.