आमदार रणधीर सावरकर हे शेतकरी, व्यापारी हितासाठी उपलब्ध असतात:कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले
3 hours ago
1
शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करणे व कर्जमाफी देण्याचे अभिवचन देणारे, व्यापाऱ्यांच्या हितासाठी सर्वांना सदैव उपलब्ध राहणारे आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,’ असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांनी केले. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते बोलत होते. या वेळी महायुतीच्या उमेदवारांनी शेतकरी आणि व्यापारी अडते यांच्या भेटीगाठी घेतल्या. संचालक पदासाठी भाजप- शिवसेना युतीच्या नेत्यांच्या पायी शरण यावे आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या विरोधात पोस्ट टाकून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काही प्रयत्न होत असला तरी शेतकरी व्यापारी अडतिया, भाजप महायुतीच्या पाठीशी आहे, असेही राजू शर्मा यांनी सांगितले. या वेळी आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांच्यासोबत अशोक गुप्ता. वसंत बाछूका, संदीप चौखंडे, राजीव शर्मा, वैभव माहोरे, विजय चतरकर, दिवाकर पाटील, स्वप्नील गावंडे, अतुल संगवी, ओम गोयनका, विष्णू केडिया, देवेंद्र सारडा, राजेश वैद्य, जुनेद बेनीवाले, सतीश राठी, रणजित गावंडे, पवन शर्मा, रमाकांत अग्रवाल, सुनील गोयनका, गोविंद जाजू, मदन ठाकरे व बाजार समिती मधील सर्व व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)