आमदारकीवर बोळवण नको, सरकारने महसूल किंवा शिक्षण खाते द्यावे- हाके:मनोज जरांगेंनी मराठा समाजाचे 205 उमेदवार कुठे निवडून आले ते सांगावे
2 hours ago
1
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचे २०५ उमेदवार कुठे निवडून आले सांगावे. खोट्या गोष्टी सांगून दिशाभूल करू नये. मराठा समाजाचे ११२ आमदार निवडून आले आहेत. ओबीसी नेत्यांना सर्व जातींनी सहकार्य केले. राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्या सांगण्यानुसार जरांगे यांचे आंदोलन सुरू होते. आमच्या आंदोलनावर अनेक आरोप झाले, पण आम्ही ठाम भूमिका घेतली. आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. ज्यांना आम्हाला निवडणुकीत पाडायचे आहे, त्यांना पाडले आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे. राज्यात सत्ता बदलण्याची आम्ही भाषा केली आणि ते करून दाखवले. माझी विधान परिषदेवर बोळवण करू नये, तर मी राज्यातील अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने नवीन सरकारने मला कॅबिनेट मंत्रिपद देऊन महसूल किंवा शिक्षण खाते द्यावे, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोमवारी पुण्यात केली. छगन भुजबळांचा पराभव करण्यास गेलेले जरांगे तोंडघशी छगन भुजबळ यांचा पराभव करण्यास गेलेले जरांगे तोंडघशी पडले आहेत. घनसावंगीमध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव केला याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे. मी जिंतूर, अहमदपूर, माजलगाव, गेवराई, भूम, तुळजापूर, परतूर आदी मतदारसंघांत सभा घेतल्या. येथे उमेदवारांना चांगले मताधिक्य मिळाल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)