आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटकी माणसे:आमची निष्ठा कोसळणार नाही, पराभूतही होणार नाही -संजय राऊत; तावडे 'कॅश'कांडावरही निशाणा
4 days ago
2
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटकी माणसे असल्याचा दावा करत या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटके माणसे आहोत. आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीज करून कोंड्याचे मांडे करून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे आमची निष्ठा कोसळणार नाही, पराभूतही होणार नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा नव्हे तर आचारसंहितेचा भंग व प्रेस कॉन्फरंस घेतल्याच्या फालतू कारणांसाठी दाखल करण्यात आल्याचेही नमूद केले. महाराष्ट्रात बुधवारी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू आहे. त्यानंतर शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार स्थापन होईल. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र होऊ देऊ नका संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राची यंदाची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या काळात झालेल्या निवडणुकीची आठवण करून देणारी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या काळातील निवडणूक महाराष्ट्र टिकवण्यासाठी, मुंबईत महाराष्ट्रात टिकवण्यासाठी, महाराष्ट्रातील मराठी माणसांचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी झाली होती. त्यात महाराष्ट्राचा विजय झाला. त्याच पद्धतीची ही निवडणूक आहे. या महाराष्ट्राचे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विकृतीकरण सुरू आहे. महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र व्हायचे नसेल तर महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे आहे. संजय राऊत यांनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्यावर टीका करणे खूप सोपे आहे. पण आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटके माणसे आहोत. आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीज करून कोंड्याच्या मांडे करून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. विक्रोळी मतदारसंघात माझे बंधू लढवत आहेत. तिथे राज ठाकरे यांनी एकूण 3 सभा घेतल्या. त्यांची एक वेगळी भूमिका आहे. मी या जमिनीवर प्रामाणिकपणाने एका निष्ठेने ठामपणे उभा आहे. निष्ठा महत्त्वाची आहे. आम्ही निष्ठा विकली नाही. त्याची पोटदुखी त्यांना आहे. ते कितीही इथे आले, तर तरी आम्ही आमची निष्ठा कोसळणार नाही किंवा पराभूत होणार नाही. मी वारंवार हे लोकांना सांगतो. आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई आम्ही सांभाळतो तुम्ही महाराष्ट्रात जास्त लक्ष घालण्याचे सांगितले आहे. संजय राऊत यांनी यावेळी राज ठाकरे यांना कोणत्या अदृश्य शक्तींचा पाठिंबा आहे हे वेगळे सांगायचे गरज नाही, आम्ही यासंबंधी कुणाचेही नाव घेण्याचे गरज नाही असेही अप्रत्यक्षपणे पीएम मोदी व शहांचा नामोल्लेख टाळत म्हणाले. तावडे 'नोट फोर व्होट'वरही निशाणा संजय राऊत यांनी यावेळी नालासोपाऱ्यात भाजप नेते विनोद तावडे यांनी कथितपणे पैसे वाटल्याच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, नालासोपाऱ्यात कोट्यवधींचा व्यवहार झाला. त्या खोलीत 5 कोटी होते. हे मी सांगत नाही, तर ते रेकॉर्ड टीव्ही व कॅमेरे दाखवत आहेत. संपूर्ण हॉटेलमध्ये 15 कोटी होते. कुठे गेला पैसा? केवळ 9 लाख दाखवले. जो गुन्हा दाखल झाला आहे, तो पैशांचे वाटप केल्याचा नाही तर आचारसंहितेचा भंग केल्याचा, प्रेस कॉन्फरंस घेतल्याचा आदी फालतू कारणांसाठी दाखल करण्यात आला आहे. ठिक आहे, आज निवडणूक होऊ द्या, नंतर पाहून घेऊ. नाशिकमध्ये सोमवारी एकनाथ शिंदे यांचे कोट्यवधी रुपये पकडण्यात आले. त्यानंतर तेथील लक्ष हटवण्यासाठी नालासोपाऱ्यातील घटना उजेडात आणली गेली. हे भाजपवाले पैसे गोळा करण्यात माहीर आहेत, असे ते म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)