आर्थिक व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी शाळेतच लावले 72 स्टॉल:विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारात दीड तासांत भाजीपाला, खाद्यपदार्थांची विक्री होऊन 22 हजारांची उलाढाल‎

1 day ago 1
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहराचे ज्ञान मिळावे यासाठी शाळेने पुढाकार घेऊन आनंद मेळाव्याचे उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला व खाद्यपदार्थांचे ७२ स्टॉल लावले. दीड तासांत या स्टॉलवर २२ हजार रुपयांची विक्री झाली. अहमदनगर एज्युकेश सोसायटीच्या वांबोरी येथील प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळा समितीचे को-चेअरमन हेमंत मुथा, मुख्याध्यापिका मिना पवार, ग्रामस्थ, पालक आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात ग्रामपंचायतींसह विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणे असे उपक्रम राबवले जातात. बालआनंद मेळाव्याच्यानिमित्ता ने, विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्याची कल्पना मांडण्यात आली होती. त्यात भाजीपाल्याचे ३० तर खाद्यपदार्थांचे ४२ स्टॉल होते. या बाजारात खरेदीसाठी व खाऊ खाण्यासाठी विद्यार्थ्यांना घरून पैसे आणायला सांगितले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांकडून खरेदी केली. त्याचबरोबर पालकांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. महेश मुनोत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी देखील खरेदीसाठी दाखल झाले होते. सुमारे दीड तासातच भाजीपाल्यासह खाद्यपदार्थ विकले गेले. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे २२ हजार २७९ रुपयांची विक्री झाली. असे घेतले व्यवहार ज्ञान ज्या विद्यार्थ्यांनी खरेदीसाठी पैसे आणले होते, त्या विद्यार्थ्यांनी दुकानदार विद्यार्थ्यांशी भाव करून खरेदी केली. तसेच विक्री करणाऱ्याने आवश्यकतेनुसार बेरीज व वजाबाकी करून उरलेले पैसे मागे दिले. त्यावेळी सुट्या पैशांचे महत्वही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. ज्या विद्यार्थ्यांनी विक्रीचे स्टॉल लावले, त्यांनी केलेली भांडवली गुंतवणूक व नफा याबाबत शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article