उत्सवात "माझी शाळा’ नाटिकेतून विद्यार्थ्यांनी जागवल्या आठवणी:अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल, बी. आर. हायस्कूलतर्फे आयोजन
4 hours ago
1
बी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात अकोला अर्बन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत व विद्याभारती संलग्नित अहिल्यादेवी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. "माझी शाळा' या कल्पनेवर अहिल्यादेवी स्कूल व बी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी नाटिका सादर केली. यातून उपस्थितांना त्यांच्या शाळेतील आठवणी जागृत झाल्या. उद्घाटनानंतर बी. आर. हायस्कूल व अहिल्यादेवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्नेहसंमेलनास अकोला अर्बन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पांडे, सचिव नाना मोहरील, कोषाध्यक्ष भूषण बापट, बी. आर. हायस्कूल माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष अजय सेंगर, सचिव श्याम गोटफोडे, सहसचिव विकास मस्के, बी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास देशपांडे, अहिल्यादेवी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मायी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनीता शहा यांनी केले. आभार शालिनी पिंपळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दोन हजार स्वातंत्र्यवीरांची माहिती व छायाचित्रांचे प्रदर्शन रविवारी सुरू करण्यात आले. हे प्रदर्शन बी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सोमवारीही अकोलेकरांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या कलाकृती केल्या सादर बी. आर. हायस्कूल व अहिल्यादेवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आम्ही कलावंत असल्याचे दाखवून दिले. केजीच्या मुलांनी ब्राझील डान्स, पढोगे तो लिखोगे व बम बम भोले या गाण्यांवर नृत्य सादर केली. इयत्ता पहिली व दुसरी विद्यार्थ्यांनी "छोटा बच्चा जानके हमको' व "चांद तारे तोड लावू' या हिंदी चित्रपट गीतांवर नृत्य सादर केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रीमिक्स गाण्यावर ठेका धरला. चौथीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विषयावर प्रस्तुती केली. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका, कव्वाली व ग्रुप डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)