अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्य हल्ल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. एवढच नाही तर इतकी सुरक्षा असूनही चोर इतक्या सहजपणे एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात कसा काय शिरू शकतो. असा प्रश्न सर्वांनाच पडला.
त्यामुळे आता नक्कीच सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर सैफच्या घराखालील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सैफ रुग्णालयात असून त्याची दोन्ही मुलं करीष्मा कपूरच्या घरी आहेत.
पापाराझींना आणि मीडियाला दूर राहण्याचं आवाहन
दरम्यान करीना कपूरही या हल्ल्यामुळे पुरती घाबरली असून तिने पापाराझींना आणि मीडियाला दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार पापाराझी आणि मीडियाच्या सततच्या कव्हरेजमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाला स्पेस देण्याचं आवाहन तिने केलं आहे. खास करून पापाराझींना तिने कव्हरेज पासून दूर रहा अशी विनंती केली आहे.
प्रायव्हसी ठेवण्याची करीनाची विनंती
करीना कपूर, सैफ आणि त्यांच्या मुलांसाठी तर पापाराझी नेहमीच तिच्या बिल्डींगभोवती फिरत असतात. करीना आणि सैफची मुले तैमूर-जेह यांच्या कॅमेरात कैद करण्यासाठी पापाराझी नेहमी सज्ज असतात.
करीना मुलांबरोबर कुठेही गेली तरी त्यांच्यामागे पापाराझींचा फेरा असतोच. सैफवर हल्ला झाल्यानंतरही पापाराझी त्यांच्या घराबाहेर दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हसी ठेवा अशी विनंती करीनाने केली आहे.
करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मीडिया आणि पापाराझींना या प्रकरणाबद्दल आणि त्यांचे कव्हरेज न करण्याची विनंती करणारी पोस्ट शेअऱ केली आहे. पापाराझींच्या सततच्या कव्हरेजमुळे तिची आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असं तिने गुरुवारी रात्री एक निवेदन जारी केलं.
“मीडिया आणि पापाराझींनी थांबावं” अशी करीनाची विनंती
करीनाने लिहिलंय, “आमच्या कुटुंबासाठी हे एक अविश्वसनीय आणि आव्हानात्मक दिवस आहेत. आम्ही अजूनही घडलेल्या घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही या कठीण परिस्थितीतून जात असताना मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी थांबावं. सतत अनुमान आणि कव्हरेज थांबवा.”
करीनाने पुढे लिहिलंय, “सततचं कव्हरेज आमच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की तुम्ही आमच्या स्पेसचा आदर करा आणि आम्हाला आवश्यक असलेली ती स्पेस द्या. एक कुटुंब म्हणून या गोष्टी समजून घ्या. या संवेदनशील काळात तुम्ही समजून घेतल्याबद्दल आणि समर्थनासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते.” सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे सिने जगतातील अनेक कलाकारांमध्ये भितीचं वातावरण आहे.