एक हैं तो सेफ हैं ... हा मुद्दा योग्य वाटतो:शरद पवारांच्या नेतृत्वामुळे मी आक्रमक होतो- अजित पवार

2 hours ago 1
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. बारामती मतदारसंघात काका-पुतण्यामध्ये होणाऱ्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिव्य मराठीने अजित पवार यांच्याशी संवाद साधला असून त्यांची एक मुलाखत घेतली आहे. वाचा नेमके काय म्हणाले अजित पवार... प्रश्न : ‘एक हैं तो सेफ हैं’ असे म्हणत मोदीसुद्धा बटेंगे तो कटेंगे याच आशयाचे नॅरेटिव्ह सेट करत नाहीयेत का ? अजित पवार : कटेंगे-बटेंगे ही एक प्रकारे लोकांना एकमेकांपासून विलगतेची भावना निर्माण करणारी संकल्पना आहे. त्याउलट ‘एक हैं तो सेफ हैं’मध्ये सर्वसमावेशकता आणि एकीचा प्रत्यय येतो. त्यात काहीच वावगे वाटत नाही. प्रश्न : एरवी आक्रमक असणारे अजित पवार महायुतीमध्ये बचावात्मक का? अजित पवार : पूर्वी पक्षाची जबाबदारी शरद पवारांची होती. म्हणून पक्षविस्तारासाठी प्रसंगी माझ्यात अधिक आक्रमकता येत असे. आता मात्र मला सोबतच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रथम विचार करावा लागतो. माझ्या एखाद्या भूमिकेने अथवा शब्दानेही सहकाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून भूमिका ठरवावी लागते. प्रश्न : जागावाटपात एवढी तडजोड का? अजित पवार : तडजोडीचा प्रश्न नाही. उगीच जास्त जागांचा आग्रह धरून कमी जागा निवडून आणायच्या यामध्ये काही अर्थ नसल्याने जिथे खरी ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरलो आहोत. महायुतीत तिन्ही पक्षांच्या वाट्याला जागा किती आल्या यापेक्षा कुणाच्या किती निवडून येतात ते अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. प्रश्न : बारामतीच्या लढाईत काका जिंकणार की पुतण्या? अजित पवार : लोकसभेच्या वेळी खासगीत बारामतीकर सांगायचे की, लाेकसभेला ताई, विधानसभेला दादा असे करणार आहे. तसेच घडलेही आहे. त्यामुळे आता विधानसभेला तसेच होईल ही खात्री आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article