काळेंनी दिलेल्या निधीची मतदानाने परतफेड करा:महानंदाचे माजी उपाध्यक्ष जाधव यांचे आवाहन

2 hours ago 1
तालुक्याच्या पश्चिम भागातील जिव्हाळ्याच्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार आशुतोष काळे यांनी ४१.५१ कोटी निधी आणला. निवडणुका आटोपताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पण होणार आहे. तत्पूर्वी आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीची परतफेड २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भरभरून मतदानातून करून द्या, असे आवाहन महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव यांनी केले. मायगाव देवी येथे महायुतीचे उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत जाधव बोलत होते. जाधव म्हणाले, कोपरगाव मतदार संघ हा अवर्षणग्रस्त असल्यामुळे आपल्याकडे दरवर्षी पाऊस कमी पडतो. नैसर्गिक आपत्तीमुळे आपला मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. मंजूर, चास नळी, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य पण अंधकारमय झाले होते. भूगर्भातील पाणी पातळी खालावली होती. आ. काळे यांनी मंजूर बंधाऱ्यासाठी ४१.५१ कोटींचा निधी दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article