महायुतीचा महाविजय झाला. त्यात भाजपाने सर्वाधिक जागा खेचून आणल्या. मुख्यमंत्री भाजपाचा झाला. पण याकाळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य अधिक गाजले. आता विधानसभेचा निकाल येऊन बराच काळ लोटला असला तरी उद्धव ठाकरे सेनेने एकनाथ शिंदे यांना डिवचण्याची संधी काही सोडली नाही. आजच्या सामनातील रोखठोकमधून चिमटे नि गुदगुल्या केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे हे शुन्यात गेल्याचा खोचक टोला लगावला. ते दोन धक्क्यातून सावरले नसल्याचा टोला हाणला.
संजय राऊतांची तुफान बॅटिंग
सामनातील रोखठोक मधील विषय सर्वांनाच माहिती आहे. महायुतीत एकसंघात नाही, एक वाक्यता नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, कुरघोडी करण्याची ताकद भाजपाने संपवल्याचा टोला त्यांनी हाणला. भाजपामुले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाचा एक सरपटणारा प्राणी झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे वचन दिल्यानंतरच ते शिवसेनेतून फुटल्याचे खासगीत ते सांगतात, असे राऊत म्हणाले.
हे सुद्धा वाचा
मी खोटं बोलत नाही, त्यांना जाऊन विचारा
एकनाथ शिंदे यांना भाजपाने विधानसभा निवडणूक 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असे ते खासगीत सांगतात. मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे राऊत म्हणाले. पण निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केले.
बातमी अपडेट होत आहे…