पिंपरी: निगडी, प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 24 येथील संत कबीर उद्यान परिसरात चक्क बिबटा वावरताना पाहून नागरिकांची बोबडी वळली. त्याबाबत तात्काळ महापलिका अग्निशमन विभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले. हा प्रकार रविवारी सकाळी अकराच्या सुमाऱ्यास समोर आली. तासाभरात बिबटा जेरबंद करण्यात आला.
बिबटा आल्याची खबर वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने बिबटा पाहण्यासाठी आणि त्याला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसाचा मोठा फौज फाटा तेथे दाखल झाला.
अग्निशमन विभागाने लगोलग बिबट्या फॉरेस्ट टीमला पाचरण केले. त्या पथकाचे मोठया चपलळाईने बिबट्या शोध घेऊन त्याला भुलीचे इजेक्शन दिले. त्याला बावधन येथील केअर सेंटरमध्ये नेण्यात येत आहे.ही घटना आज सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घडली.