एकीकडे व्होट जिहादचा आरोप..:..तर दुसरीकडे मुस्लिमांसाठी 10 दिवसांत 15 शासन निर्णय, बहुतांश निर्णय छत्रपती संभाजीनगरसाठीच

1 hour ago 1
राज्यात लव्ह जिहादच्या १ लाखपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी १४ मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ झाला, असा आरोप १ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. लोकसभेला मुस्लिमांनी महायुतीला साफ नाकारत मविआतील उद्धवसेनेलाही एकगठ्ठा मतदान केले होते. त्याचा थेट उल्लेख न करता फडणवीसांनी हा आरोप केला होता. मात्र, त्यांच्याच पुढाकाराने चालणाऱ्या महायुती सरकारने अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी गेल्या १० दिवसांत १५ शासन निर्णय जारी केले आहेत. विशेष म्हणजे अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार पालकमंत्री असलेल्या छत्रपती संभाजीनगरसाठीच यातील बहुतांश निर्णय असल्याचे दिसत आहे. राज्यातील इतर मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघांसाठी असे निर्णय घेतलेले नाहीत. म्हणजे अल्पसंख्याकांसाठी निर्णय घेतानाही भेदभाव केला आहे. लोकसभेला महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे पाटील सत्तारांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात २७,७५९ मतांनी मागे पडले होते. दानवेंना ७३,२७८ तर काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना १,०१,०३७ मते मिळाली. आता विधानसभेचा बिगुल वाजण्यापूर्वीच सत्तार यांच्या अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण चार महत्त्वाचे शासकीय आदेश जारी केले आहेत. सिल्लोड (संभाजीनगर) येथे उर्दू घर बांधकामासाठी ४.०२ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे बांधकाम सिल्लोड नगर परिषदअंतर्गत येणाऱ्या भूखंड क्रमांक ३०, ३१ वर होईल. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मुख्यालयाची प्रशासकीय इमारत, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाची प्रशासकीय इमारत आणि अल्पसंख्याक आयुक्तालय प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १४ कोटी ९९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. म्हणजे एकट्या छत्रपती संभाजीनगरसाठी गेल्या १० दिवसांत ४८ कोटी ९९ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. अल्पसंख्याकांसाठी घेतलेले इतर निर्णय असे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article