एकेरी वाहतुकीमुळे ट्रक-कारची धडक, पती-पत्नी जागीच ठार

2 hours ago 1
राहुरी मालवाहतूक ट्रक व कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास नगर-मनमाड राज्य महामार्गावरील गुहा (ता. राहुरी) हद्दीतील सेल पेट्रोल पंपासमोर घडली. दीपक म्हसे व माया म्हसे, रा. ममदारपूर, बाभळेश्वर ता. राहाता, असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. बाभळेश्वर येथील म्हसे दाम्पत्य आपल्या एमएच १४ एव्ही ३३७२ या कारने शिर्डीकडे जात होते. गुहा हद्दीतील सेल पेट्रोल पंपासमोरील वनवे रस्ता असल्याने नगरच्या दिशेला जाणारा मालवाहतूक ट्रक व कार ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन एकमेकाला धडकली. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याने ड्रायव्हर शिटवर बसलेले दीपक म्हसे व शेजारी बसलेल्या माया म्हसे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघाताची भीषण घटना घडताच नगर-मनमाड राज्य महामार्गावर अन्य वाहनचालकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. हा अपघात एकेरी वाहतूक चालणाऱ्या रस्त्यावर घडल्याने नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कारमध्ये दबलेले म्हसे पती-पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. मालवाहतूक ट्रक व कारच्या अपघातात कारची अशी दूरवस्था झाली. छाया : राजेंद्र वाडेकर. रस्त्यावर दररोज घडताहेत अपघात नगर-मनमाड राज्य महामार्गावरील गुहा हद्दीत रस्त्याचे काम रखडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. शिर्डीकडून नगरकडे व नगरकडून शिर्डीकडे जाणारी वाहनासाठी काही ठिकाणी खराब रस्ता असल्याने अपघाताच्या लहान मोठ्या घटना रोजच घडत आहेत, असे गुहा येथील ग्रामस्थ भगवान वाबळे यांनी सांगितले. मृत दीपक म्हसे मृत माया म्हसे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article