प्रवरा शारदीय नवरात्रौत्सवातून भारतीय परंपरा अन् संस्कृतीचे जतन-संवर्धन:डॉ. सुश्मिता विखे यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
नवरात्र काळात प्रवरा शैक्षणिक संकुलात विद्यार्थी केंद्रीत वैविध्यपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम झाले. नऊ दिवसांत आदिशक्तीच्या नऊ रूपातील पराक्रमकथा, नारीतत्त्वाचे शक्तिमान रूप, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील मातृदैवतांचे महत्त्व, महिला आणि श्रम संस्कृतीचा मानसन्मान, महिला संरक्षण, आरोग्य जागर करणाऱ्या व्याख्यानमाला, व्यावसायाभिमुख कौशल्य विकसित करणाऱ्या कार्यशाळा अशा कौशल्याधिष्ठित कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना आणि आत्मनिर्भरता जागृत करण्यात आली. प्रवरा शारदीय नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे जतन-संवर्धन होत आहे, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे यांनी केले. सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवरा शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी "स्त्रीशक्ती जागर" नाटिका सादर केल्या. यावेळी विविध कर्तृत्ववान स्त्रियांच्या भूमिका विद्यार्थिनींनी साभिनय सादर केल्या. अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई डुक्रे पाटील या होत्या. डॉ. सुश्मिता विखे म्हणाल्या, भारत देश अतिप्राचीन काळापासून शिव-शक्तीचा उपासक आहे. नवदुर्गा म्हणजे दृष्टांचे निर्दालन करणारी देवता होय ! म्हणूनच पवित्र हाताने, पवित्र मनाने आणि सदविचार, आचाराने हा नवदुर्गेचा नवरात्रोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करूया. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थ िनी प्रचंड उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सात्रळ क्लस्टरचे समन्वयक डॉ. नवनाथ शिंदे यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी मानले. बिल्डिंग प्रवरा कार्यक्रम राबवणार मुलांनी नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे करण्यासाठी बिल्डिंग प्रवरा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यार्थी व स्टाफ यांचे १५२ स्टॉल लोणी येथे १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान लावण्यात येणार आहेत. उद्योजकता विकास, विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग स्किल, जाहिरातीचे युग, खरेदी-विक्री कला आणि नफा या संबंधाची माहिती विद्यार्थ्यांना कृतीतून अनुभवता यावी असा व्यापक उद्देश ह्या बिल्डिंग प्रवरा उपक्रमाचा आहे, असे डॉ. विखे यावेळी म्हणाल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article