एचव्हीपीएममधील डीसीपीईच्या 81 विद्यार्थ्यांची निवड:डीसीपीई व ग्लोबल बीआयएफएस अकॅडमीचा राेजगार करार

2 hours ago 1
शिक्षणादरम्यानच रोजगार ही आजच्या व्यावसायिक शिक्षणाची गरज झाली आहे. या जाणिवेतून एचव्हीपीएमच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाद्वारे (डीसीपीई) नुकतीच कॅम्पस ड्राईव्ह राबवण्यात आली. ग्लोबल बीआयएफएस अकादमीच्या सहकार्याने आयोजित या कॅम्पस ड्राइव्हमध्ये डीसीपीईच्या ८१ विद्यार्थ्यांची थेट रोजगारासाठी देशाच्या नामांकित कंपनीमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये सहयोग फायनान्समध्ये ३५, उत्कर्ष एसएफबी ११, इक्विटसमध्ये ४, आयसीसीआय लॅम्बोर्डमध्ये १०, बजाज अलायन्समध्ये ५, बीएफएसआयमध्ये १६ अशा एकूण ८१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकीत १० कंपन्यांद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालय व ग्लोबल बीआयएफएस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बीसीए, बीबीए, बीएससी, एमसीए शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नामांकित कंपनीच्या थेट रोजगार मुलाखतीसाठी डीसीपीई कॉलेजसह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुलाखत प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या कॅम्पस ड्राईव्ह पूर्वी महाविद्यालयाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात एका माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डीसीपीईचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल बीआयएफएस अकादमीचे हेड ऑफ डिपार्टमेंट विनय बजाज, मंडळाच्या सचिव व उपप्राचार्या डॉ. माधुरी चेंडके, प्रा. दीपा कान्हेगावकर, प्रा. प्रणव चेंडके, डॉ. अजय चेंडके, प्रा. शीतल पोहेकर, प्रा. योगेश फरकाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिलाष पंझाले यांनी केले, तर आभार प्रा. अंकिता चौधरी यांनी मानले. यानंतर महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रोजगार प्रक्रिया राबवण्यात आली. प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेत त्यांची रोजगाराकरिता निवड केली. या निवड प्रक्रियेत पात्र ८१ विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीद्वारे प्रशिक्षण देत त्यांना पात्र पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. कॅम्पस ड्राइव्हसाठी विज्ञान विभागाच्या प्रा. दीपा कान्हेगावकर, प्रा. प्रणव चेंडके, डॉ. अजय चेंडके, प्रा. शीतल काळे, प्रा. योगेश फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर यांनी निवड झालेल्या ८१ विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षणासोबत थेट रोजगार डीसीपीई व ग्लोबल बीआयएफएस अकादमी दरम्यान रोजगार निवड व प्रशिक्षणासाठी यशस्वी करार (एमओयू) झाला आहे. करारानुसार ग्लोबल बीआयएफएस बीसीए, बीबीए, बीएससी, एमसीए शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान रोजगार क्षेत्रातील मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहे. या मुळे शिक्षणादरम्यानच विद्यार्थ्यांना रोजगार सुलभरीत्या प्राप्त होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article