एलएल.बी.
Published on
:
05 Feb 2025, 1:40 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:40 am
कोल्हापूर : एलएल.बी. तीन व पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार्या सीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता 150 ऐवजी 120 प्रश्न विचारले जाणार आहेत.
तीन वर्षे मुदतीच्या एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. आतापर्यंत प्रवेश परीक्षेसाठी सुमारे 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे; तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी 20 हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार 13 फेब—ुवारीपर्यंत नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे.
राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर हा बदल केला आहे. परंतु, परीक्षा वेळेच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षेत चार पर्यायांसह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. एलएल.बी. तीन वर्षांसाठी चार विभाग आणि एलएल.बी. पाच वर्षांसाठी पाच विभागावर आधारित असेल.
एलएल.बी. 3 वर्षे : लीगल ऑप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग-24 गुण, सामान्य ज्ञान-32 गुण, लॉजिकल अँड अनालॅटिकल रिझनिंग-24 गुण व इंग्रजी भाषा ज्ञान यासाठी-40 गुण असतील. एलएल.बी. 5 वर्षे : लीगल ऑप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग-32 गुण, सामान्य ज्ञान-24 गुण, लॉजिकल अँड अनालॅटिकल रिझनिंग-32 गुण व इंग्रजी भाषा ज्ञान-24 गुण, सामान्य गणित-8 गुण असणार आहेत.
दोन तासांमध्ये 150 ऐवजी 120 प्रश्न सोडवणे हा विद्यार्थ्यांच्या द़ृष्टिकोनातून वाजवी बदल आहे. विचारलेल्या प्रश्नांवर शास्त्रीय वैज्ञानिक व विचारपूर्ण उत्तरे लिहिण्यासाठी मुबलक वेळ मिळणार आहे. ही पद्धत नॅशनल लॉ स्कूलच्या परीक्षेच्या धर्तीवर आहे.
डॉ. प्रवीण पाटील, प्राचार्य, शहाजी विधी महाविद्यालय