ओबीसी क्रीमी लेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणार?:आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित- शेंडगे,

2 hours ago 1
राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. विजयादशमीनंतर (१२ ऑक्टोबर) महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर या सरकारची ही शेवटची बैठक असू शकते. त्यात ओबीसींसाठी असलेल्या नॉन क्रीमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा ८ लाखांवरून १५ लाखांपर्यंत करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ओबीसी संघटनेचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, दर आठवड्याला मंत्रालयातील सातव्या मजल्यावर होणारी कॅबिनेट बैठक या वेळी सह्याद्री अतिथीगृहात घेण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर जनहिताचे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे ती तीन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक निर्णयांची अपेक्षा आता महायुती सरकारच्या शेवटच्या बैठकीत अनेक योजनांबाबत प्रदीर्घ चर्चा होणार असल्याने ही बैठक बराच वेळ चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेवटची बैठक असल्यानेच त्याचे स्थळ सह्याद्री अतिथीगृह निवडले असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. यापूर्वीच्या दोन मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने प्रत्येकी ३० ते ३५ निर्णयांचा धडाका लावला होता. अखेरच्या बैठकीत किती निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचे जीआरही तातडीने काढण्याची लगबग मंत्रालयातील प्रत्येक विभागात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article