हिंदू धर्म शास्त्रामध्ये पौर्णिमा तिथिला विशेष महत्त्व आहे. साधारणपणे एका वर्षात बारा अमावस्या असतात आणि एका वर्षात अधिकमास असल्यास त्या वर्षी तेरा पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेला स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी जगाचे रक्षक विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या पूजेसह गंगा स्नान केल्या जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घेऊ कधी आहे माघ पौर्णिमा? आणि माघ पौर्णिमेचे महत्त्व.
कधी आहे माघ पौर्णिमा?
यावर्षी माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 मिनिटांनी संपेल. हिंदू धर्मात तिथी सूर्योदयानुसार ठरवली जाते. त्यामुळे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारीला आहे.
का आहे माघ पौर्णिमा विशेष?
माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.
गंगा स्नानाचे महत्त्व
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्थान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते.
दान करण्याचे महत्त्व
गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)