कपाळावर टिळा लावून येणाऱ्या हिंदूंनाच दांडियात प्रवेश द्या- भाजप:छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हाध्यक्ष बोराळकर यांचे आवाहन

2 hours ago 1
नवरात्र उत्सव गुरुवार (३ आॅक्टोबर)पासून सुरू झाला आहे. या उत्सवादरम्यान दांडिया या सांस्कृतिक उपक्रमात हिंदू धर्म मानणाऱ्यांनाच व कपाळावर टिळा लावूनच प्रवेश द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, हिंदू माता-भगिनींची छेडछाड, लव्ह जिहाद, नशेखोरी असे अनेक प्रकार वाढलेले आहेत. मागील काही वर्षांपासून हिंदू धर्माच्या परंपरा न मानणाऱ्यांचा यात जास्तीत जास्त समावेश दिसून येतो. त्यांच्या सहभागी होण्यामागे विविध विकृती समोर येत आहेत. हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार यातून घडत आहेत. या घटनांवर आळा बसवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक नवरात्र मंडळाला आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हिंदू सांस्कृतिक वेश परिधान करून आलेल्यांना प्रवेश दिला जावा, प्रवेश करताना कपाळावर टिळा लावलेला असावा, यामुळे हिंदू माता-भगिनींना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असे बोराळकर यांनी त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. विहिंप म्हणते.. आधार कार्डही तपासा विश्व हिंदू परिषदेनेही राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये गरबा आयाेजन करणाऱ्या मंडळांना पत्र पाठवून फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश देताना त्यांचे आधार कार्ड तपासा, कपाळाला टिळा लावूनच आत पाठवा, असे आवाहन ते करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article