जर तुम्ही 12 लाख रुपयांचे उत्पन्न, पगार कर मुक्त झाल्याचा आनंद साजरा करत असाल तर अगोदर ही बातमी वाचाच. सरकार पगारदार वर्गासाठी कर रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या खिशावर दिसेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या बजेटमध्ये फायद्याची संज्ञा, व्याख्या बदलण्याचे संकेत दिले आहेत. आता पगारातील पार्ट-बीमधील भत्ते, फायदे गायब होणार आहेत. अर्थात याविषयी अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. पुढील आठवड्यात संसदेत सादर होणाऱ्या आयकर बिलात त्याची नांदी दिसू शकते.
भत्त्यांचे गणित पूर्णपणे बदलणार
आतापर्यंत पगारात नोकरदारांना 50 हजार रुपयांपर्यंतचे भत्ते करपात्र नव्हते. यामध्ये कंपनीकडून देण्यात येत असलेला लॅपटॉप, सोडेक्सहो, मोफत निवास, कार, नाष्टा-जेवणाचे कूपन, मेडिकल सुविधा, क्लब सदस्यत्व, ट्रॅव्हल अलाऊंस याशिवाय मोबाईल बिल, प्रोव्हिडंट फंड, एंटरटेनमेंट आणि मोफत उपचार आणि जिमचे बिल सारख्या सुविधांचा यामध्ये समावेश होता.
हे सुद्धा वाचा
हे लाभ नाही मिळणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या फायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकार जर पगारातून भत्त्यांचे हे गणित गृहित धरणार नसेल तर त्यात बदल करणार असेल तर कर्मचाऱ्यांना अडचण येऊ शकते. त्यांना मोबाईल बिल, जिम बिल, पेट्रोल, डिझेल बिलावर आता यापुढे कर वाचवता येणार नाही. ते तुमच्या पगारातच गृहित धरण्यात येतील आणि तुमचे एकूण करपात्र उत्पन्न (Total Taxable Income) वाढेल.
सरकारकडून खूशखबर
सरकारने पगारदारांना मोठा दिलासा दिला आहे. बजेटमध्ये नोकरदारांना नवीन कर प्रणालीअंतर्गत 12 लाखांपर्यंतची कमाई करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय 75,000 रुपयांची मानक वजावट (Standard Deduction) गृहीत धरुन हे करमुक्त उत्पन्न 12.75 लाख इतके होत आहे. या रक्कमेवर आयकर शून्य असेल. सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर बिल सादर करणार आहे. त्यामध्ये कर रचनेत बदलाची शक्यता आहे. तर 12 लाखांपर्यंतची कर सवलत केवळ वेतनदारांना देण्यात येणार आहे. इतर ठिकाणाहून उत्पन्न होत असले तर हा फायदा होणार नाही.