चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकप 2023 आणि या संघात चार बदल दिसून आले आले आहेत. दरम्यान, या संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेल्या करूण नायरची निवड झाली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमीमध्ये चर्चा रंगली आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यानेही याबाबत आपलं मत मांडलं. ‘एखाद्या व्यक्तीचा सरासरी 700हून अधिक आहे, ती विशेष कामगिरी आहे. पण सध्या या संघात स्थान मिळणं कठीण आहे.’ अजित आगरकरने करूण नायरबाबत अशा भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे करूण नायरचं आठ वर्षानंतर टीम इंडियात परतण्याचं स्वप्नही भंगलं आहे. करुण नायर 2016 मध्ये भारतीय वनडे संघात खेळला होता. दोन सामन्यात त्याने 46 धावा केल्या होत्या. मात्र त्याला पुरेशी संधी काही टीम इंडियात मिळाली नाही. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने चांगली कामगिरी केली आहे. विजय हजारे वनडे स्पर्धेत करुण नायरने केलेली 752 धावसंख्या आहे.
करुण नायरने टीम इंडियासाठी ६ कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 7 डावात फलंदाजी करत त्रिशतक झळकावले. मात्र या त्रिशतकानंतर तो अपयशी ठरल्याने त्याची त्यानंतर भारतीय संघात निवड झाली नाही. दोन वनडेत दिसलेल्या करुण नायरने 46 धावा केल्या. तसेच, 2017 मध्ये शेवटच्या वेळी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करुणने त्यानंतर कधीही टीम इंडियाचे दार काही उघडले नाही. करुण नायरने गेल्या वर्षभरापासून काउंटी क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करून पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. विजय हजारे या स्पर्धेत सलग शतके झळकावून टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी आशा होती. पण त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाने हुलकावणी दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशवी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.