कहना क्या चाहते हो? पाकिस्तानी क्रिकेटरचे इंग्रजी ऐकून हसू आवरणार नाही; प्रश्न विचारणारा पत्रकारही कन्फ्यूज

1 hour ago 1

क्रिकेटरच्या मुलाखतींमधील बरेचसे व्हिडीओ व्हायरल होतच असतात. पण एका पाकिस्तानी क्रिकेटरच्या मुलाखतीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून पोट धरून नक्कीच हसाल. हा क्रिकेटर आहे पाकिस्तानचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवान. त्याच्या मुलाखतीमधील त्याची इंग्रजी ऐकून चक्क पत्रकाराही गोंधळात पडला.

कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता. पण सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 13 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे मोहम्मद रिझवानच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

याच मॅचनंतर मैदानात एका पत्रकाराने मोहम्मद रिझवानला विचारलेल्या प्रश्नावर त्याने ज्या पद्धतीने इंग्रजीत उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच प्रश्न पडला की नक्की त्याला काय म्हणायचं होतं. रिझवानचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

मुलाखतीत पत्रकाराने रिझवानला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याबद्दल त्याचं मत विचारलं. त्याच्यावर उत्तर देण्याव्यतिरिक्त तो भलतंच काहीतरी बडबड करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. जे काही त्याने उत्तर दिलं त्यातही त्याला नेमकं काय सांगायचं आहे हे लक्षात येत नाहीये.

If you tin recognize what the Pakistan skipper Mohammad Rizwan is saying bash fto maine cognize 😄😀😀 pic.twitter.com/wbNfpkkjvM

— Harsh Goenka (@hvgoenka) November 16, 2024

भारतीय बिझनेस टायकून हर्ष गोयनका यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट लिहिली आहे की, “पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान काय म्हणत आहे ते तुम्हाला समजत असेल तर मला कळवा.” त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ही पोस्ट 4 लाख 62 हजार 900 लोकांनी पाहिली आहे आणि यावर जवळपास 3 हजार ‘लाइक्स आहे.

8 संघांच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयानंतर पीसीबी असहाय्य दिसत आहे. पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत (ICC) संपर्क साधला, परंतु कोणताही निर्णय हाती लागला नाही. बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी फिरवण्यासाठी पीसीबीच्या ‘ट्रॉफी टूर’मध्ये बदल केला. भारताने ज्या भागात दावा केला आहे, म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर तेथेही ट्रॉफी फिरवण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article