बरेचदा लोक घरातील आरसे स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करतात, ज्यामुळे डाग पूर्णपणे दूर होत नाहीत. यातच तुम्हालाही घरातील आरसे साफ करण्याचा कंटाळा आला असेल तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.
व्हिनेगर
जर तुम्हाला तुमच्या घरातील काचेच्या पाण्याचे डाग स्वच्छ करायचे असतील तर व्हिनेगरचे द्रावण तुम्हाला मदत करू शकते. हा उपाय करण्यासाठी, स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि पांढरा व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा, आरशावर स्प्रे करा आणि मायक्रोफायबर कपड्याने पुसून टाका. व्हिनेगर काचेवरील पाण्याचे डाग काढून टाकण्यास मदत करते.
वर्तमानपत्र
कपड्याने आरशातील ओलावा पुसणं कठीण वाटू शकतं. अशातच काच पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वर्तमानपत्राचा वापर करू शकता. वृत्तपत्र काचेवर जमा झालेला ओलावा शोषून घेते आणि ते स्वच्छ आणि चमकदार बनवते.
अल्कोहोल
अल्कोहोलच्या मदतीने आरसा देखील चमकवता येतो. हा उपाय करण्यासाठी आरशावर अल्कोहोल स्प्रे करा आणि कापडाच्या मदतीने ते पूर्णपणे घासून स्वच्छ करा.
टॅल्कम पावडर
आरसा पाण्याने पुसण्याऐवजी टॅल्कम पावडर शिंपडूनही स्वच्छ करता येतो. या उपायाने काचेवरील डाग लवकर साफ होतात. हा उपाय करून पाहिल्यानंतर थोडा वेळ आरशाला हात लावू नका. अन्यथा काचेवर बोटांचे ठसे राहू शकतात.