प्रत्येक तालुक्यात कापसाची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले आहे. मात्र, वाशीम जिल्ह्यात दिवाळीचा पाडवा उलटला तरी एकही कापूस खरेदी केंद्र झालेले नाही. त्यामुळे कापसाला हमीभाव तर दूरच, खेडा खरेदीमध्येही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत शासकीय धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असल्याने शेतकऱ्यांना व्यापा-यांकडून आर्थिक कोंडीत पकडले जात आहे३ जिल्ह्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यास परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रवर्तक मनोहर राठोड यांनी दिला आहे. कपाशी हे जिल्ह्याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे कपाशीचे नुकसान झाले असून कापसाचे सरासरी उत्पन्न कमी होण्याचा अंदाज आहे. त्यात गुलाबी बोंड अळीचा प्रभाव आला आहे. शिवाय सततच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली आहेत. यामुळे दोन वेचण्यांतच कापूस संपणार आहे. एक तर वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत, निवडणुकीमुळे कामगारांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात वेचणीचा दर किलोमागे १० रुपयांवर गेला आहे. त्या तुलनेत कापसाला सात हजारांपर्यंतच भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही, अशी शंका मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे. ५ नोव्हेंबरला जिल्ह्यात सीसीआय कापूस केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र महिना संपत आला तरी एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. शेतकरी संघटनेचा सवाल, कर्ज परतफेड कशी करावीॽ जिल्ह्यातील मानोरा व मंगरूळनाथ हे दोन तालुके कापसासाठी प्रसिद्ध आहेत. बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने दिवाळीतच कापसाची उंलगवाडी झाल्याने उसनवारीवर व सावकारीने बी बियाणांसाठी आणलेल्या पैशाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. प्रशासनाने तातडीने जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मनोहर राठोड यांनी शासनाकडे केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)