Published on
:
01 Feb 2025, 2:00 am
Updated on
:
01 Feb 2025, 2:00 am
कोल्हापूर : हजेरी लावून कामावरून गायब असणार्या 27 सफाई कर्मचारी आणि 3 टिप्पर चालकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिला.
फिरतीदरम्यान काही कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे त्यांनी विभागीय कार्यालयातील प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा उपआयुक्त व सहा. आयुक्त यांना समक्ष भागात जाऊन फिरती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे 27 सफाई कर्मचार्यांचे व 3 टिप्पर चालकांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी उपआयुक्त पंडीत पाटील यांना दिल्या.
राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत 5 सफाई कामगार कामावर नव्हते. 3 टिप्पर दुपारी भागात नसल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत 13 सफाई कामगार व ई/5 अंतर्गत महाडिक माळ येथे 9 सफाई कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात केले. ही फिरती उपआयुक्त पंडित पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे यांनी केली.