यावेळी इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डीआरडीओचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, महासंचालक प्रा. प्रतीक किशोर, डीआरडीओचे संचालक डॉ. ए. पी. दास, अंकाती राजू, एम. व्ही. रमेश कुमार उपस्थित होते. सध्या देशात 159 विमानतळे 2047 पर्यंत आणखी 200 विमानतळे बांधणार तर 2047 पर्यंत 350 कोटी लोक विमानाने प्रवास करतील.
पाच वर्षांत 50 नवी विमानतळ
नायडू म्हणाले, मोठ्या शहरांतील हवाई वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरांतर्गत हवाई टॅक्सी सेवा केला जाणार आहे. त्याची प्रायोगिक चाचणी 2026 मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे दिल्ली, मुंबई, पुणे शहरांसारख्या अनेक मोठ्या शहरांतील वाहतूक कोंडी टाळता येईल. तसेच 2047 पर्यंत विमानतळांची संख्या 200 ने वाढविली जाईल. पुढील पाच वर्षांत पन्नास नवीन विमानतळ आकाराला येतील. यापैकी नोएडा आणि नवी मुंबई या दोन ठिकाणची विमानतळे पूर्णत्वास आली आहेत.