किमान 14, तर कमाल तापमानात 30 अंशांपर्यंत घट:दोन दिवस थंडी वाढणार
6 hours ago
1
निवडणुकीचे तापलेले वातावरण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थंडावले तशीच जिल्ह्यात थंडीही वाढत आहे. गुरुवारी किमान तापमान १४, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस राहिले. किमान व कमाल तापमानात घट झाल्यामुळे जिल्ह्यात दुपारी ४ पासूनच थंडी जाणवायला लागली. पुढील दोन दिवस पारा १.५ अंशांनी खाली जाऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली असून, उत्तरेकडून थंड वारे जिल्ह्याकडे वाहायला लागले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी तापमान ०.५ अंशाने खाली आले. बुधवारी तापमान १४.५ अंशांवर होते. तापमानाचा पारा १२.५ अंशांपर्यंत खाली गेल्यावर थंडीचा कडाका वाढू शकतो. येत्या दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, तो कोणत्या दिशेला सरकणार यावरून जिल्ह्यातील पुढील तापमान अवलंबून आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा जिल्ह्यावर कोणताही परिणाम झाला नाही, तर कोरडे व थंड वातावरण पुढील १० दिवस तरी कायम राहील. तसेच थंडी हळूहळू वाढत जाईल, असा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, थंडीत वाढ होत असल्याने नागरिकांनी गरम कपडे खरेदी करण्यासाठी धाव घेतली आहे. स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोप्या, हातमोजे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील रस्त्यांवर गरम कपडे विकणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. थंडी वाढत असल्याने नागरिक उबदार कपडे खरेदी करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)