कोल्हापूर ः हद्दवाढीअभावी शहरवासीयांची झालेली खुराड्यासारखी अवस्था शिवाजी पेठेत उभारलेल्या जागृती फलकातून व्यक्त करण्यात आली. ‘आता कुणी बी काय बी म्हणू द्या, हद्दवाढीसाठी लढाई आरपारची...’ असा मजकूर फलकावर लिहिला आहे. हद्दवाढीसंदर्भात जागृती करण्यासाठी हा फलक उभा करण्यात आला आहे.
शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, आर. के. पोवार, महेश जाधव, रविकिरण इंगवले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. महेश जाधव म्हणाले, हद्दवाढीच्या आरपार लढाईचा प्रारंभ शिवाजी पेठेतून केला आहे. हद्दवाढ होईपर्यंत गप्प बसून चालणार नाही. यावेळी चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, लालासाहेब गायकवाड, श्रीकांत भोसले, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, संग्राम जरग, सुशील भांदिगरे व कार्यकर्ते उपस्थित होते.