श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला. दुसर्या छायाचित्रात श्रद्धा वालकर. File Photo
Published on
:
15 Nov 2024, 5:21 am
Updated on
:
15 Nov 2024, 5:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला हा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीच्या हिटलिस्टवर असून, शुभम लोणकर हा पूनावालाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
शुभन लोणकरने घेतली आफताबची माहिती
एका रिपोर्टनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोस्ट वाँटेड २४ संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील दोन मोस्ट वाँटेड आरोपी झीशान अख्तर आणि शुभम लोणकर अद्याप फरार आहेत. पुण्यात राहणाऱ्या शुभम लोणकरला अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा व्यापक प्रयत्न करत आहे. आता पोलीस तपासात श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला हाही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर असल्याचे तपासात समोर येत आहे. कारण लोणकर हा पूनवाला याची माहिती गोळा करत असल्याचे , बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तपासात समोर आले आहे.
मोस्ट वॉण्डेट शुभम लोणकर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये अकोला पोलिसांनी शुभम लोणकर याला शस्त्रास्त्र कायद्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून ती शस्त्रेही जप्त करण्यात आली होती. शुभम लोणकर याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असून तो बंदुकीच्या तस्करीत सहभागी असल्याचे अकोला पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या तपासात शुभम लोणकर याने अनमोल बिश्नोई याच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप बिझनेसच्या माध्यमातून संपर्क साधल्याचे समोर आले आहे. शुभम लोणकर हा बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्याची पुष्टी मिळाली आहे.
आरोपी आफताब पूनावालाच्या विकृतीने हादरला होता देश
मे २०२२ मध्येवसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा लिव्ह इनमध्ये राहणारा पार्टनर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत त्याच्या राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवून तब्बल तीन आठवड्यांत टप्प्याटप्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील जंगलात टाकत, त्याची विल्हेवाट लावली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. आफताब सध्या तिहार कारागृहात आहे. आता तो बिश्नोई टोळीच्या हिटलिटस्वर असल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र एटीएससह गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
नावाला याच्यावर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आयपीसीच्या कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी २०२३ रोजी ६,६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.