गड किल्ल्यांवर दारू-ड्रग्स घेतल्यास 2 वर्षे शिक्षा तसेच लाखांचा दंड:कायदेशीर लगाम घालण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

2 hours ago 3
गड किल्ल्यांवर दारू आणि ड्रग्स सेवन केल्यास आता दोन वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंड होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार तसेच विविध संघटनांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरी देखील काही नागरिकांकडून या गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडत असल्याचे समोर येत असते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण हा नेहमीच सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांची जोपासना करणे हे आपले कर्तव्य असल्याने याबाबत जनजागृती करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या गड किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी आजही ताज्या होतात. मात्र, या किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्याच्या घटना समोर येत असतात. तरुणाई देखील या गडकिल्ल्यांच्या मोकळ्या जागेत असे गैरकृत्य करतात. मात्र, आता याला कायदेशीर लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्यांने जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या आधी राज्य मंत्रिमंडळाने असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल या बैठकीत केंद्र सरकारचे अभिनंदन देखील करण्यात आले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article