पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आनंद जिल्ह्यातील खंभात भागात मोठी कारवाई केली. एटीएसने एका औषध उत्पादन ठिकाणावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. याबाबतची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. या छाप्यादरम्यान अनेक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याची पुष्टी एटीएसचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) सुनील जोशी यांनी केली.
दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "एटीएसने पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरली जाणारी १०७ किलोपेक्षा जास्त अल्ट्रा झोलाम पावडर जप्त केली आहे."