गुजरातमध्ये बसचा भीषण अपघातANI Photo
Published on
:
02 Feb 2025, 4:50 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये आतापर्यंत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होती. महाराष्ट्रातून येणारी एक लक्झरी बस गुजरातमधील हिल स्टेशन सापुताराजवळ उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
VIDEO | Gujarat: A bus fell into a deep valley in Dang district, leaving several injured. Deputy SP Sunil Patil says, “Some passengers have been rescued and are undergoing treatment… At around 4:30 am today, a luxury bus coming from Maharashtra overturned near Saputara - a hill… pic.twitter.com/eQNlxgV0Je
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2025