कोलगाव ः जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या दारू सहित संशयित. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलिस दडपसे, मनोज राऊत आदी.pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:10 am
सावंतवाडी ःगोवा दारूची चोरटी वाहतूक करणार्या अलिशान कारचा पोलिसांनी कोलगावपर्यंत पाठलाग करत कार कोलगाव मारुती मंदिर येथे अडवली. या कारमधून सुमारे 1 लाख 83 हजार रुपये किमतींची गोवा दारु व 7 लाखाची कार असे मिळून पोलिसांनी 8 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी विराज लक्ष्मीकांत वाडकर (21, रा. कोलगाव चर्च), अंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स किनळे व वीरेंद्र वासुदेव जाधव (दोघेही रा.वाडा पडेल, ता. देवगड) या तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास करण्यात आली.
एका आलिशान कारमधून गोवा दारूची देवगडकडे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सापळी रचला होता. अशी संशयित कार सावंतवाडीतून पास होताच पोलिस प्रवीण वालावलकर व सहकार्यांनी कारचा पाठलाग करत कोलगाव मारुती मंदिर येथे कार अडवली. यावेळी कारची तपासणी केली असता कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची दारू मिळून एकूण 1 लाख 83 हजार रुपये किमतीची गोवा दारू आढळून आली.
पोलिसांनी या दारूसह 7 लाख रुपयांची आलिशान क्रेटा कारही ताब्यात घेतली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई फत्ते करण्यात आली. याप्रकरणी वाहन चालक विराज लक्ष्मीकांत वाडकर, अंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स, वीरेंद्र वासुदेव जाधव या तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.