महायुतीतर्फे आदिवासींसाठी विकासगंगा:आ. पवार यांच्या सभेत ‎‎पगार यांचे प्रतिपादन‎

1 hour ago 1
सुरगाणा मतदारसंघात आमदार नितीन पवार यांनी २२०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त करत मतदारराजाशी परिसरातील विकासकामांना चालना मिळाली. आदिवासी वस्तीत सभामंडप, रस्ते, पूल, शेतीसाठी वीज, पाणी, आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागले. स्व. ए. टी. पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सर्वसामान्य जनता, मतदारराजाशी नाळ जोडलेली आहे, असे प्रतिपादन कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनीकेले. जुनी बेज येथे महात्मा जोतिबा फुले पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नितीन पवार यांच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. बेज परिसरात अनेक विकासकामे केली. मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन कृष्णा बच्छाव म्हणाले की, कळवण तालुक्यात बिनबुडाचे आरोप, अफवा अपप्रचार सुरू असून विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता तालुक्याच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी सभापती धनंजय पवार, कृष्णा पाटील, उपसरपंच शीतलकुमार अहिरे, मोहन जाधव, राजेंद्र भामरे, संजय बच्छाव, रमेश बच्छाव यांच्यासह अनेक गावांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article