सिडकोत ठाकरे गट व भाजप समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्यानंतर अंबड पोलिस स्टेशनसमोर झालेली गर्दीpudhari
Published on
:
16 Nov 2024, 3:37 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:37 am
सिडको : नाशिक पश्चिम मतदार संघात सिडकोतील सावतानगर परिसरात स्लीप वाटप असल्याच्या संशयावरून भाजपा व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. या घटनेत घटनास्थळी फायरिंग तसेच धारदार शस्त्र काढण्यात आल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेने शुक्रवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत चांगलेच वातावरण तापले होते त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्तांसह संपूर्ण नाशिक शहरातील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा अंबड पोलीस ठाण्याच्या अवतीभवती तैनात करण्यात आला होता. या घटनेत रात्री उशिरापर्यंत दोन्हीही घटकाच्या जखमी पदाधिकाऱ्यांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
सिडकोतील सावतानगर परिसरातील हनुमान चौक परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ठाकरे गटाचे काही पदाधिकारी मतदारांना स्लीपा वाटत होते. यावेळी महायुतीच्या तसेच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना सदर ठिकाणी स्लिपा वाटपाबरोबर पैसेही वाटप होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी घटनास्थळी गेले यावेळी जोरदार शिवीगाळ झाल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी दोन्हीही गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि हाणामारी झाली या हाणामारीत दोन जण जखमी झाल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात भवती जमाव जमावला. दरम्यान कारवाईची मागणी केली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोळीबार केला तसेच धारदार शस्त्र उभारले असा आरोप हायुतीच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आला. दरम्यान स्वामी विवेकानंद नगर येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची ही सभा होते यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर प्राणघात खाल्ला झाल्याचे समस्त त्यांनीही पोलीस ठाणे गाठले . अंबड पोलिस ठाणे येथे दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता . या घटनेनंतर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तात्काळ अंबड पोलिस ठाणे येथे दाखल झाले . या वेळी पोलिसांनी दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची समजूत काढली . या नंतर अंबड पोलिस ठाणे येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .
भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे व भाजपा उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी अंबड पोलिस ठाणे येथे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची भेट घेऊन आरोपी वर कारवाई करण्याची मागणी केली
अंबड पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप
घटनेनंतर अंबड पोलिस ठाणे येथे परिसरातील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले . सुरक्षा दलाच्या दोन ते तीन तुकडया तैनात करण्यात आले .
आमचे बूथ लेवल एजंट प्रभाग क्रमांक २५ मधील सावतानगर परिसरात लोकशाही पद्धतीने मतदारांना स्लीपा वाटप करत होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सावता नगर येथे बूथ एजंट तसेच कार्यकर्त्यांना जबरदस्तीने मारहाण करून त्यांच्यावर धारदार शस्त्र काढून प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करताय असे भाजपाच्या लोकांना वाटत होते तर त्यांनी कायदा हातात न घेता पोलिसांना सांगणे गरजेचे होते. एन निवडणुकीत भाजपा तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण खराब केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करावी.
सुधाकर बडगुजर, (उमेदवार, महाविकास आघाडी, ठाकरे गट, नासिक पश्चिम मतदार संघ)
दोन्ही गटात हाणामारी झाली त्याची माहिती घेत आहोत. सीसीटीव्ही बघून आरोपींचा शोध घेत आहोत. हा वाद नेमका काय त्याचा तपास सुरू आहे. पुरावे बघून प्राथमिक स्वरूपात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. नाशिक शहरात कोणीही कायदा हातात घेऊ नये, पोलीस कडक भूमिकेत आहे. संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
मोनिका राऊत - पोलिस उपायुक्त