गोवा : बहिणीने दोघांना वाचविले; पण भाऊ बुडाला

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Oct 2024, 11:51 pm

Updated on

17 Oct 2024, 11:51 pm

फोंडा : साईनगर-तिस्क उसगाव येथे बुधवारी, 16 रोजी ओहोळात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी (दि.17) खांडेपार नदीत तरंगताना आढळला. दर्शन संतोष नार्वेकर (वय 11) असे त्याचे नाव आहे. तो खासगी शिकवणी संपल्यावर घरी परतत होता. ओहोळ पार करताना मुसळधार पावसामुळे ओहोळाचे पाणी अचानक वाढल्याने तो वाहून गेला होता. दर्शन सोबतच्या विद्यार्थ्यांना दर्शनच्या बहिणीने वाचवले. मात्र, दर्शन ओहोळाच्या पाण्यातून वाहून गेला. तब्बल सतरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दर्शनचा मृतदेह सापडला.

दर्शन नार्वेकर याचे कुटुंबीय मूळचे पाट्ये-लोढा खानापूर कर्नाटक येथील असून ते सध्या साईनगर येथील रहिवासी आहेत. भामई-पाळी येथील ताराबाई दळवी विद्यालयात दर्शन नार्वेकर इयत्ता पाचवीत शिकत होता. संध्याकाळी शिकवणीसाठी गेलेला दर्शन आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसमवेत घरी परतत असताना ओहोळाला अचानक पाणी आले. एकमेकांचे हात धरून ओहोळ पार करीत असताना पाणी वाढल्यामुळे दर्शनचा हात सुटल्याने तो वाहून गेला. मुलांनी यावेळी आरडाओरड केली.

इतर विद्यार्थीही वाहून जाण्याच्या मार्गावर असताना दर्शनची मोठी बहीण तेथे पोचली. तिने बाकीच्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, दर्शन तेथे दिसला नाही. त्याचा हात सुटून तो वाहून गेल्याचे इतरांनी सांगितले. यावेळी दर्शनच्या बहिणीने व इतरांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रात्री उशिरापर्यंत दर्शन सापडला नव्हता. तब्बल सतरा तासानंतर गुरुवारी दुपारी दर्शनचा मृतदेह खांडेपार नदीत तरंगताना सापडला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दर्शनच्या पश्चात आई, दोन बहिणी असा हा परिवार आहे. दर्शनचा मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यासाठी शववाहिका नसल्याने नवा पेच निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्ते राजेश वेरेकर यांनी शववाहिका उपलब्ध केल्याने हा प्रश्न सुटला.

आठवड्याभरात खानापूरवर दोन आघात

खानापूर भागात आठवड्याच्या भरात दोन आघात झाले आहेत. यापूर्वी गेल्या 8 तारखेला करंबळ-खानापूर येथील प्रशांत घाडी हा युवक तिस्क-उसगाव येथील अपघातात ठार झाला होता. बुधवारी पाट्ये-खानापूर येथील पण तिस्क - उसगाव येथे राहणारा दर्शन नार्वेकर हा बुडून मृत झाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article