चंद्रपूर जिल्हात वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या शस्त्रांच्या आकडा धडकी भरविणारा आहे. वाढत्या बेकायदा शस्त्रांच्या संख्येमुळे चंद्रपूरचे बिहार होतेय काय? असा उपस्थित होत आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या विविध कार्यवाहीत 294 शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर 124 आरोपींना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेलेल्या शस्त्रामध्ये बंदूक, तलवार, जिवंत काडतूसे,चाकू या शस्त्राचा समावेश आहे. 2022 -23 या दोन वर्षात झालेल्या कार्यवाहीच्या तुलनेत 2024 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यवाहीचा वेग वाढल्याचे दिसत आहे.
खरंतर 2024 वर्षात चंद्रपूर जिल्हात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनी जिल्हा हादरला होता. हत्या, गोळीबार, बॉम्ब फेक, दरोडे या घटनानी शहरात दहशत निर्माण झाली होती. असुरक्षितेची भावना वाढली होती. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याचे दिसले. त्यांनी शस्त्र बाळगणाऱ्यावर कार्यवाहीचा धडाका लावला. वर्षभरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला.
शस्त्र नेमके येतात कुठून?
जिल्हात झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेत वापरण्यात आलेली बंदूक बिहार राज्यातून आणल्याचे तपासात उघड झाले होते.चंद्रपूरात परराज्यातून शस्त्र येत होती, यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र शस्त्र येत असताना त्याची साधी मागमूसही पोलिसांना लागू नये हे आश्चर्यकारक आहे.
जिल्ह्यातील जप्त केलेल्या शस्त्रांची आकडेवारी
- 2022 मध्ये एकूण 66 कार्यवाही करण्यात आल्या. या कार्यवाहीमध्ये 6 बंदूक,जिवंत काडतुसे 11,तलवार आणि इत्तर शस्त्र 49 जप्त करण्यात आलेत.
- 2023 मध्ये 6 बंदूक, जिवंत काडतुस 6,बंदूक,बारूद 200 ग्राम,एकूण शस्त्र 53 जप्त करण्यात आले.
- 2024 वर्षात सर्वाधिक शस्त्र जप्त करण्यात आलीत. बंदूक 30,जिवंत काडतुस 124, तलवार आणि शस्त्र 126 जप्त करण्यात आली आहेत.या तीन वर्षात एकूण 334 आरोपीना अटक करण्यात आली आहे.