चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. File Photo
Published on
:
22 Jan 2025, 11:21 am
Updated on
:
22 Jan 2025, 11:21 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीरोजी पहाटे घरात घुसून जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला होता. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला बुधवारी लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्याला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. सैफ आणि त्याची पत्नी करीना कपूर यांच्यासोबत मुंबई पोलिसांचे तीन जवान सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. याआधी सैफला मुंबई पोलिसांची सुरक्षा नव्हती. तपासानंतर आणखी सुरक्षा वाढविण्याची शक्यता आहे.