जालना (CM Ladki Bahin Yojana) : राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी राज्य सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील हप्ता हा 26 जानेवारी 2025 रोजीच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती नवनिर्वाचित आमदार आणि जालना विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अर्जुनराव खोतकर (MLA Arjunrao Khotkar) यांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आ. खोतकर म्हणाले की, राज्यातील युतीचे सरकार (Coalition Government) पुन्हा सत्तेवर आले, त्यामुळे लाडक्या बहिणींनात्यांचे पैसे मिळणार नाही, अशा प्रकारच्या वावड्या विरोधकांकडून उठवण्यात येत होत्या. परंतू राज्य सरकारने (State Govt) जेव्हा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आणि आता जानेवारीचा हप्ता सुध्दा 26 जानेवारी 2025 रोजीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे आणि युतीच्या जाहीरनाम्याप्रमाणेच महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून आ. खोतकर म्हणाले की, महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली असून 28 जून 2024 रोजी या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1,500 असा आर्थिक लाभ देण्यात येतो. तो आता अधिवेशनानंतर लगेचच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येणार आहेत.
एप्रिल पासून 2100 रु. देण्यात येणार!
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मीतीस (Employment Generation) चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन करणे, त्या स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिला व मुलीच्या सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अंवलबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या (Ladki Bahin Yojana) योजनेचा प्रमुख प्रमुख उद्देश असून प्रत्येक पात्र महिलेला नियमानुसार तिच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार असल्याचेही आ. खोतकर यांनी सांगितले. बहुतेक करून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता हा एप्रिल महिन्यापासून सुरु होईल, अशी माहितीही आ. खोतकर यांनी दिली आहे.