छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात ‘जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि रिमोट सेन्सिंग फॉर वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट’ या विषयावर सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (Faculty Development Program) यशस्वीरीत्या संपन्न झाला. 6 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या (एफडीपी) मध्ये राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर तज्ञांनी जलसंपदा व्यवस्थापन (Water Resources Management) क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.
तज्ञांचे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन…
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी एनआयटी वारंगल (NIT Warangal) येथील संस्थेचे डॉ. के. वेंकटा रेड्डी यांनी मॉडेलिंग या विषयावर मार्गदर्शन केले. याशिवाय आयआयटी हैदराबाद येथील डॉ. के. बी. व्ही. एन. फणिंद्र, आयआयटी बॉम्बे येथील डॉ. राज रामशंकरण, व्हीनआयटी नागपूर येथील डॉ. अश्विनी मिरजकर, एसपीसीई मुंबई येथील डॉ. रेश्मा रास्कर फुले, वाल्मी येथील डॉ. दिलीपजी. दुरबुडे, डब्लूसीडी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. पी. आर. सारडा, तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल (Government Engineering College), छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. डी. जी. रेगुलवार, व देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज येथील डॉ. ए. एस. पठाण आणि डॉ. एस. डी. शिंदे यांसारख्या तज्ञांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. याशिवाय, इंजि. विकास घडामोडे यांनी सॉफ्टवेअर वरील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या सत्रांमुळे प्राध्यापकांच्या (Professors) व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा झाली आणि त्यांना व्यावहारिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम केले.
तज्ञांच्या (Experts) मार्गदर्शनातून प्राध्यापकांना जिओग्रफिक इन्फॉमेशन सिस्टीम, रिमोट सेन्सिंग व इंटरनेट ऑफ थिंग्स आदि तंत्रज्ञानांचा प्रभावी वापर कसा करावा हे शिकवले. यातून प्राध्यापक जलसंपदा व्यवस्थापन शेतीसाठी जलसिंचनाचे सुधारित उपाय यासह पर्यावरणीय समस्यांचे निराकरण (Solving Environmental Problems) करण्यात सक्षम बनले असल्याचे प्रभारी संचालक डॉ. सुभाष लहाने यांनी सांगितले. दरम्यान यामुळे शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित होण्यास चालना मिळेल असेही ते म्हणाले.