Beed: वाल्मिक कराड अडचणीत!

2 hours ago 1

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी

29 डिसेंबरला झाली सर्वांची भेट

बीड (Beed) : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा पाय आणखी खोलात जाईल, असा पुरावा समोर आला आहे. हा वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जात आहे. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्यादिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांचे पाय अजून खोलात गेले आहेत.

पोलीस देखील कटात सामील असण्याची शक्यता!

सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड (Valmik Karad) या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील (PSI Rajesh Patil) हेदेखील वाल्मिक कराड (Valmik Karad) यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही (Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गैंगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाटील कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article